मोठी घोषणा! राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार

0
736

मोठी घोषणा!
राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात.
(विशेष प्रतिनिधी -दिलीप परदेशी )
उद्या (१८ जानेवारी) नोकर भरतीची पहिली जाहिरात निघणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं कामही पूर्ण होईल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील भरती संदर्भातील मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून लवकरच  एकूण १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पदांची भरतीची जाहिरात उद्याच प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला होता. आरोग्य यंत्रणेवरील सध्याचा ताण लक्षात घेता येत्या काळात एकूण १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.
कोरोना काळात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं नोकरीचं कंत्राट संपलं असलं तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरतीवेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार असल्याचं राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे.