नगरदेवळा ग्रामपंचायतीत शिवसेनेला धक्का; राष्ट्रवादी-भाजपला यश

0
536

पाचोरा:- एन एस भुरे । तालुक्यातील नगरदेवळा येथील ग्रामपंचायतीत गत २५ वर्षांपासून सत्तेत असणार्‍या शिवसेनेला निकालातून धक्का बसला असून राष्ट्रवादी व भाजपला येथे यश मिळाले आहे.

याबाबत वृत्त असे की, आज सकाळी लागलेल्या निकालातून नगरदेवळा या अतिशय महत्वाच्या गावात शिवसेनेला हादरा बसला आहे. येथे गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. यंदा मात्र निवडणूक अतिशय चुरशीची झाली. यात शिवसेनेला ७ तर भाजप व राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या आहेत.

(सविस्तर वृत्त लवकरच)

आम्हाला फॉलो करा