तृतीयपंथी अंजली (जान) विजयी!!

0
815

तृतीयपंथी अंजली (जान) विजयी!!
प्रतिनिधी – दिलीप परदेशी)
महाराष्ट्रातील लक्षवेधी निवडणूक जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी अंजली (जान )हिने वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून दणदणीत विजय मिळवला आहे. जेव्हा अंजली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेंव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला होता कारण तृतीयपंथी असल्याने तिला महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही मतदार यादीतही तिच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख ‘इतर’ असा असल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजलीने हार मानली नाही. तिने आपली सहकारी तृतीयपंथी शमिभा पाटील हिच्या मदतीने न्यायासाठी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले. या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्याने तिचा न्याय मिळाला. न्यायालयाने तिच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तिची उमेदवारी मान्य करावी लागली आणि आज त्यांनी या निवडणूकीत दणदणीत विजयही मिळवला आहे.