परधाडे येथे ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव मिळाल्याने हाणामारी बन्सीलाल पाटील यांच्यावर ३०७ अन्वेय गुन्हा तर त्यांच्यासह ११ जनाविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये आट्रासिटी गुन्हा दाखल

0
787

पाचोरा प्रतिनिधि पूजा येवले,
परधाडे येथील बन्सीलाल पाटील यांनी आपली पत्नी कविता पाटील यांच्यासह सात उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे केले असताना साथही उमेदवारांचा पराभव झाल्याने विरोधी पक्षातील कार्यकर्ते राहुल सोनवणे, सोपान सोनवणे, रवींद्र सोनवणे, विकास सोनवणे यांच्यासह इतरांना काठ्यांनी लाठयामार केला . तसेच जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. राहुल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून बन्सीलाल पाटील, कविता पाटील मुकेश पाटील, शुभम पाटील, योगेश पाटील, मनोज पाटील, अविनाश पाटील ,संगीता पाटील,सखुबाई महाजन सुभाष पाटील, लक्ष्‍मीबाई महाजन अशा अकरा जणांच्या विरोधात पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. पंचायत समितीतील माजी सभापतीसह अकरा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी सभापती बन्सीलाल पाटील यांच्यावर ३०७ सह आट्रासिटीचा आणि ३९५ कलम अन्वेय गुन्हा तर त्यांच्यासह ११ जनावर पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये आट्रासिटी व जिव ठार मारण्याची धमकी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला माजी सभापतीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून १५ जनाविरुध्द लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला