ता.जामनेर- पहुर पासून जवळ पाच किलोमीटरवर औरंगाबाद रस्त्यावर हिवरी फाट्यावर मोटारसायकलला समोरून येणाऱ्या कारने धडक तीनजन गंभीर

0
2763

पहुर जवळ मोटरसायकल ला कारची धडक;३गंभीर.

ता.जामनेर- पहुर पासून जवळ पाच किलोमीटरवर औरंगाबाद रस्त्यावर हिवरी फाट्यावर मोटारसायकलला समोरून येणाऱ्या कारने धडक दिल्याची घटना आज दि.१९ रोजी रात्री८वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ३जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,ताहीर शेख कालू, आरीफ अय्यूब व अलिम तडवी सर्व रा.पहुर पेठ हे तीनही एका मोटारसायकल वरुन रात्री८वाजेच्या सुमारास वाकोद कडून पहुर कडे येत होते.त्यांना पहुर कडून वाकोद कडे येणाऱ्या कार ने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकल वरील तीघांना गंभीर दुखापत झाली असून कारने ही तीन पलट्या मारल्या.धडक देणारी कार वाकोद येथील असल्याचे बोलले जात आहे.
माहिती मिळताच १०८ रुग्ण वाहिकेचे पायलट अमजद खान व डॉक्टर मोहम्मद लियाकत यांनी पहुर ग्रामीण रुग्णालयात आणून प्रथमोपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.