महाराष्ट्र रुग्णवाहिका १०८ वाहन चालक संघटना यांच्या तर्फे महाराष्ट्रातील सर्व 108 रुग्णवाहिका चालकांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत निवेदन आरोग्य मंत्री मा. ना. श्री राजेशभैय्या टोपे व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मा ना श्री राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले

0
847

पाचोरा (प्रतिनिधी)

आज दिनांक 20 / 1 / 2021 रोजी आरोग्य मंत्री मा. ना. श्री राजेशभैय्या टोपे व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मा ना श्री राजेंद्र पाटील याड्रावकर यांना महाराष्ट्र रुग्णवाहिका १०८ वाहन चालक संघटना नोंदणी क्रमांक डि एन ई ९८० यांच्या तर्फे परत निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील सर्व 108 रुग्णवाहिका चालकांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत निवेदन दिले

कोवीड काळात सर्व चालकांनी आरोग्य कर्मचार्‍यांन बरोबर उत्तम कामगिरी करूनही कोवीड भत्ता तसेच समान काम समान वेतन लागू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली या वेळी संघटनेचे अध्यक्ष श्री मनोहर भोपी उपाध्यक्ष श्री विनोद सलागरे सचिव श्री संदिप जाधव खजिनदार कु. स्वप्निल म्हात्रे श्री किशोर महाडिक श्री संजीव पाटिल श्री ज्ञानेश्वर जगताप उपस्थित होते