जामनेर __ शहरातील प्रसिद्ध व्यापारी मयुर टेडर्स चे मालक राजकुमार कावडीया यांच्या कडे टाटा कंपनीचे बनावट मीठ साठा सापडला आहे .

0
600
  • ( प्रतिनिधी ) पाचोरा

जामनेर चे मयुर ट्रेडर्स चे मालक राजकुमार कावडीया कडे टाटा कंपनीचे बनावट मीठ साठा सापडला : बनावट मीठ साठा लाखोंच्या घरात

जामनेर __ शहरातील प्रसिद्ध व्यापारी मयुर टेडर्स चे मालक राजकुमार कावडीया यांच्या कडे टाटा कंपनीचे बनावट मीठ साठा सापडला आहे .
सदरील बनावट मीठ साठ्याची लाखोच्या घरात किंमत आहे .
मुंबई येथील आय पी इन्व्हीं स्टीगेशन डीटेक्टू पथकाने केलेल्या तपासणीत लाखोंचा माल हस्तगत झालेला आहे .
सदर घटनेबाबत जामनेर पोलिस स्टेशनला पथकाच्या खबरी नुसार गुन्हा नोंदवण्याचे कामकाज सुरु आहे .
जामनेर मार्केट कमेटी च्या व्यापारी गोडाऊन मध्ये ३५० गोण्या च्या जवळपास टाटा कंपनीचे हे बनावट साठा मिळून आला आहे .
सदरच्या पथकात मोहम्मद चौधरी , मोहम्मद खान , जावेद पटेल , अनिल मोरे यांचा समावेश आहे .
सदरच्या प्रकाराने शहरात खळबळ माजली आहे.
सर्व सामान्य नागरीकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे .