केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत पाचोरा नगरपालिकेतर्फे पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजना राबविण्यात येत आहे

0
238

पाचोरा प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत पाचोरा नगरपालिकेतर्फे पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजना राबविण्यात येत असून या अंतर्गत ५२४ पथविक्रेत्यांनी या योजनेसाठी अर्ज केले असून जास्तीत जास्त पथविक्रेत्यांना लाभ देण्यात यावा, असे विनंती वजा सूचना शाखा प्रबंधकांना करण्यात आल्या.

स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा येथे १५६ प्रकरणे प्रलंबित असून २८ जानेवारी पर्यंत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याबाबत नगराध्यक्ष गोहील यांनी सांगतीले. तसेच मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी राष्ट्रीयकृत बॅकाव्यतिरीक्त इतर बॅकेत असलेले अर्ज हे एचडीएफसी बॅंक व आयडीबीआय बँक यांनी स्विकारुन त्यांची प्रकरणे पुर्ण करावी असे आवाहन वजा विनंती केली. कर्ज मिळण्यासाठी ज्या व्यावसाईकांना अडचणी येत असतील त्यांच्या अडचणी सोडविण्याकरीता अशा नागरीकांनी मला संपर्क करावा असे तसेच ज्या पथविक्रेत्यांनी अद्यापही अर्ज केलेले नाहीत, त्यांनी त्वरीत अर्ज सादर करावेत असे आवाहन नगराध्यक्ष संजय गोहील यांनी केले आहे.