मा. आमदार रोहित पवारांच्या हस्ते शुभारंभ. कजगाव येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे.

0
194

पाचोरा (प्रतिनिधी)

कजगाव परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये गोरगरिब रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. सविस्तर वृत्त असे की आता चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील मध्यवती ठिकाणी कजगाव येथे नविन विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे आज २४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा आ रोहित पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला असून परिसरातील रुग्णांना लांब जाण्याची गरज नाही पाचोऱ्याच्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांन साठी डॉ भूषण मगर डॉ सागर गरुड यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेला ८ मार्च २०१९ पासून सुरु केले आहे. याचा लाभ संपूर्ण जिल्हयातील गोरगरिबाण होत आहे . तसेंच पाचोरा भडगाव चाळीसगाव तालुक्यातील बऱ्याच वर्षांनंतर प्रथमच पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयास महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस शासनाकडुन मान्यता मिळाली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात व पाचोरा सारख्या तालुक्याच्या ठिकाणी १२० खाटांच्या आरोग्य सुविधांनी सज्ज असलेल्या गोर-गरिब रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या योजनेस सुरूवात झाली आहे, आता चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील मध्यवती ठिकाणी कजगाव येथे रुग्णाच्या सेवेत सुरू करण्यात आले. या वेळी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भुषण मगर डॉ.सागर गरुड, डॉ.प्रिती मगर, डॉ.अंबिका घोष डॉ संदीप इंगळे डॉ प्रवीण देशमुख डॉ अनुजा देशमुख विनोद परदेशी उपस्थिती होते