आनंदाची बातमी : पाचोऱ्यात कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात

0
777

पाचोरा (प्रतिनिधी)पाचोरा भडगाव मतदारसंघातील कोविड लस चे शुभारंभ आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.पहिले लस तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली.तसेच उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे,पोलिस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडे, नगर अध्यक्ष संजय गोहिल, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पोलीस उपनिरीक्षक किशनराव नजन पाटील.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील.मा नगरसेवक गणेश पाटील.किशोर बारवकर.सतिष चेडे.वालमिक पाटील यांच्या उपस्थितीति होती

पाचोरा ( प्रतिनिधी ) येथील गेल्या मागील वर्षभरापासून जगभरात कोरोना वायरसने थैमान घातले असून या राष्ट्रीय महामारी संकटाला संपूर्ण देशभरातील नागरिक युद्ध पातळीवर सामना करीत आहे .2021 वर्षामध्ये कोरोना पासून मुक्त होण्यासाठी लसीचे शोध लावून रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आली. या हेतूने महाराष्ट्र शासनाकडून देखील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही लस उपलब्ध करण्यात आली असून नागरिकांना लस पुरविले जाणार आहे या लसीचे उद्घाटन पाचोरा भडगाव मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले यावेळी पहिले लस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ व ग्रामीण रुग्णालयाचे डॉ अमित साळुंखे यांना देण्यात आले . लसीचा कुठल्याही नागरिकांना गैरसमज होऊ नये म्हणून आधी ही पहिली चाचणी जनतेच्या विश्वासासाठी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यावेळी आ किशोर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजकाल सोशल मीडियाच्या कार्यकाळात लसीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे व चुकीच्या अफवा पसरविले जात आहे. तरी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाच्या व आपल्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी लस घ्यावी असे आवाहन आ किशोर पाटील यांनी केले आहे या वेळी तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे

लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास जाणवला नाही – डॉ. समाधान वाघ

पाचोऱ्यात सर्व प्रथम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी कोरोना व्हायरसची प्रतिकारक लस टोचून घेतली. लस टोचल्यानंतर सुमारे तीन तासांनंतर डॉ. समाधान वाघ यांच्याशी संवाद साधला असता मला कुठल्याही प्रकारची लक्षणे जाणवत नसुन आपली कोरोना पासुन वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या व्हाट्स अप वर संदेश आल्यानंतर प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ व ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी नागरिकांना केले आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे डॉ गवळी नगराध्यक्ष संजय गोहिल स्वीय सहायक राजेंद्र पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पाटील किशोर बारावकर आरोगपरिचरिका नीता राठोड जोसना पाटील अधिपरीचारीका कोळी सिस्टर वैशाली राठोड नेनाव वाघ हरिदाखान वर्डबाय अर्जुन पाटील नितीन कुलकर्णी दीपक मोरे किशोर साळवे,एक्सरे टेकनेेसीन अमर भाऊ ज्ञानेश्वर चोधरी औषध उपचार वितरण विभागाचे अशोक माळी आकाश ठाकूर
व सर्व ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टॉप व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.