पाचोरा, प्रतिनिधी !
पाचोरा तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी दि. २८ रोजी दोन टप्प्यांत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यात अनुसूचित जाती साठी – ४, अनूसुचिच जमातीसाठी – १०, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी – २७ तर खुल्या प्रवर्गासाठी – ५६ जागांचे आरक्षण जाहीर झाले. निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर झाल्याने ज्या गावात अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी आणि त्यातल्या त्यात ५० टक्के जागांसाठी महिलांचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. काहींनी निवडणुकीत पैसा खर्च करून ही मनासारखे आरक्षण न निघाल्याने त्यांचेवर पश्च्यातापाची वेळ येवुन ठेपली आहे.
तालुक्यात अनुसुचित जातीच्या ७ जागांपैकी नाचणखेडा, बदरखे, कोल्हे व गाळण बु” येथे महिला राखीव, अनुसुचित जमातीच्या १० जागांपैकी बांबरुड (राणीचे), निंभोरी बु”, वडगांव कडे, सारोळा बु” व दहिगांव या ५ गावांसाठी महिला राखीव जाहीर झालेल्या असुन सारोळा बु” येथे अनुसूचित जमातीचा उमेदवार नसल्याने रिक्त जागेवर पुन्हा निवडणूक घेतली जाणार आहे. तर निंभोरी बु” येथे अनुसूचित जमातीसाठी स्री राखीव जागा नसल्याने त्या जागी पुरुषाला संधी दिली जाणार आहे.
नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी १३ ग्रामपंचायतीत महिला राज
पाचोरा तालुक्यात २७ पैकी १३ नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २७ जागा राखीव करण्यात आल्या होत्या. त्यापैकी लोहटार, गोराडखेडा बु”, कुऱ्हाड खु”, आसनखेडा बु”, माहेजी, वरसाडे प्र. पा., अंतुर्ली बु”, प्र. पा., डांभुर्णी, तारखेडा खु”, वाडी, बाळद व ओझर अशा १३ गावांमध्ये महिलांसाठी आरक्षण निघाले आहे. यावेळी निवडणूक नायब तहसिलदार संभाजी पाटील, नायब तहसिलदार बी. डी. पाटील, अजिंक्य आंढळे, भरत पाटील, राजकुमार धस, दिलीप सुरवाडे, सुनिल पाटील, यांनी सहकार्य केले.