महिला कामगारांना १४ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने पाचोरा तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू

0
236

फळरोप वाटीकेतील महिला कामगारांना १४ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने पाचोरा तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू
पाचोरा, प्रतिनिधी !

पाचोरा येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पाचोरा तालुक्यातील १० व जामनेर तालुक्यातील ६ महिला रोजगार , पाचोरा व जामनेर कार्यालयाच्या कृषी कार्यालयातील फळरोप वाटीकेत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून या महिलांना डिसेंबर २०१९ पासून मानधन मिळालेले नसल्याने भारतीय मजदूर संघ जळगाव या संघटनेच्या माध्यमातून पाचोरा येथील मीराबाई रमेश कोळी, बेबाबाई शिवाजी पाटील, सुरेखाबाई राजू चौधरी, चंद्रकला दिनकर पाटील, सोनाबाई नारायण चौधरी, दुर्गाबाई जनार्धन शिंदे, लिलाबाई पुंडलिक पाटील, वात्सलबाई नीलकंठ कोळी, राजू बाबुराव खराडे, अरुण शिवाजी यादव, जामनेर येथील अहिल्याबाई वामन तायडे, द्वारकाबाई रामराव गायकवाड, आशाबाई नारायण पोळ, निर्मलाबाई किसन वराडे, रुखमाबाई मारुती झाल्टे, या महिला दि. २७ जानेवारी पासून साखळी उपोषणास बसल्या असून त्यांना २ दिवसात न्याय न मिळाल्यास दि. ३० जानेवारी पासून आपल्या कुटुंबियांसह आमरण उपोषणास बसणार आहे. याबाबत भारतीय मजूर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पी.जे. पाटील , नगरपरिषद कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष धनराज पाटील, शिवसेनेचे शहराध्यक्ष किशोर बारावकर, पप्पू राजपूत यांनीही उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.