शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी पाचोरा येथे पी.आर.पी तर्फे तिरंगा रॅली

0
322

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी पाचोरा येथे पी.आर.पी तर्फे तिरंगा रॅली
पाचोरा, प्रतिनिधी !

केंद्र सरकार शेतकऱ्यांवर जुलमी जाचक एकतर्फी कायदा पास करुन शेतकऱ्यांवर जो अन्याय केला व त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडले आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. म्हणून केंद्र सरकार व जुलमी जाचक एकतर्फी कायदे रद्द करण्यात यावे म्हणून पाचोरा रेल्वे स्टेशन येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) व विविध संघटनांतर्फे शेतकऱ्यांची जाचक जुलमी कायदे रद्द करण्यात यावे असे आशयाचे निवेदन पाचोरा स्टेशन मास्टर यांना देण्यात आले. पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडू सोनवणे उपाध्यक्ष पी. आर. पी. पाचोरा, बापू गायकवाड (भडगाव), रोहित ब्राह्मणे (पाचोरा), अमोल पगारे पाचोरा, जनार्दन सोनवणे पाचोरा, आदींच्या निवेदनावर सह्या आहे.