सार्वजनिक आरोग्य विभाग तर्फे सक्रिय कुष्ठ रुग्ण व क्षय रुग्ण शोध व नियमित स नियंत्रण मोहिमेचे उद्घाटन
सार्वजनिक आरोग्य विभाग तर्फे सक्रिय कुष्ठ रुग्ण व क्षय रुग्ण शोध व नियमित स नियंत्रण मोहिमेचे उद्घाटनसदर कार्यक्रम निमित्त प्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यारपण व दीपप्रज्वलन करून, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ भरत पाटील व डॉ सुनील गवळी यांच्या हस्ते मोहिमेची सुरुवात करण्यात आली . यावेळी डॉक्टर इम्रान सर , श्री. एकनाथ पाटील, हर्षल पाठक , आकाश ठाकूर, श्री अमरसिंग तसेच ग्रामीण रुग्णालय व शहर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर मोहीम आशा व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत अतिजोखमीच्या भागात प्रत्येक घरोघरी जावून सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये संशयित कुष्ठ रुग्ण व संशयित क्षय रुग्ण यांचा शोध घेवुन बहुविध औषध उपचार खाली आणणे हा उद्देश या मोहिमेचा आहे.