चक्क लालपरी रुग्णालयात दाखल – थेट धावली प्रवाशाच्या मदतीला

0
510
  • चक्क लालपरी रुग्णालयात दाखल – थेट धावली प्रवाशाच्या मदतीला
    पाचोरा (प्रतिनिधी) : प्रवाशी असलेले मोतीलाल आनंदा चौधरी वय 66 ववर्षे राहणार गाव धामनोद जिल्हा धार मध्य प्रदेश येथून अमळनेर बस मधून प्रवास करीत पाचोरा बस स्थानक येथे उतरले व त्यानंतर पाचोरा बस स्थानकावरून शिंदाड गावी जाण्यासाठी पाचोरा आगाराची एस. टी बस निघत असते, सदर प्रवाशी गाडी आगारात उभी असल्याल्यानंतर स्वतः जाऊन सीट मिळवून सीटवर बसलेले होते, त्यानंतर चालक व वाहकांनी गाडीत फेरीत करण्याच्या काही वेळे अगोदरच प्रवाशांकडून समजले की मोतीलाल आनंदा चौधरी यांची तबीयत अचानक बिघडली अशा परिस्थितीत क्षणाचाही विलंब न लावता रुग्णवाहिकेची वाट पाहत न बसता तसेच तात्काळ एस.टी. चालक व वाहकाने पाचोरा ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे सदर प्रवाशाला एस. टी बस मध्येच नेत दाखल केले यावेळी सर्वांकडून एस. टी.बस या आवारात कशीकाय असा सूर निघाला पण त्याच पेशंटला वाचविण्यासाठी हेच सर्वचजण मदतीला धावत बस मधून रुगण्यालात दाखल केले, यावेळी ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ ब्रदर ज्ञानेश्वर पाटील, सिस्टर वैशाली, राठोड अमोल मापारे, वाय. डी. पाटील, यांनी मदत करत डॉक्टर अमित साळुंके यांनी तपासणी केली असता पेशंट ला मृत घोषित केले, वाहतूक नियंत्रक डी. बी. महाले, चालक एस. वि. महाजन, वाहक देशमुख, बस क्रमांक एम. एच. 14 बीटी 13 40 यांचे सर्वदूर कौतुक केले जात आहे,