महाराष्ट्र राज्य विज वितरणातून 37 वर्षीय प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

0
582

पाचोरा ( प्रतिनिधी )

महाराष्ट्र राज्य विज वितरणातून 37 वर्षीय प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
श्री. मगणलाल छगनलाल पाथरवट हे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीत प्रधान यंत्र चालक या पदावरून 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा देत रविवार दि. 31/01/2021 रोजी सेवानिवृत्त झाले, यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम दि. 01/02/2020 सोमवार रोजी श्री. सुभाष झेंडू भावसार, (निवृत्त जेष्ठ नागरिक संघ महामंत्री), श्री. पी.जे.पाटील (भा.म. संघ जळगांव जिल्हा अध्यक्ष) श्री. सुरेश चंद्र सोनार, श्री. श्याम अंबादास दासकर, या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रसाद हॉल पाचोरा येथे स्नेहभोजनासह संपन्न झाला, त्यांची पत्नी घर सांभाळत असुन यांना दोन मुले व एक मुलगी आहेत, दोघेही मुले महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीत सेवा देत आहेत, तर मुलगी सुखाने सासरी नांदत आहे, पाथरवट यांच्या पुढील भविष्याच्या सुखी, समृद्धी, व उत्तम आरोग्यासाठी पाचोरा शहर कक्ष ऑफिस व कर्मचारी स्टाफ, मांस व वि. व. ले. पाचोरा विभाग, जैन टेंट हाऊस, एम. आय. डी. सी उपकेंद्र पाचोरा, बाह्यस्रोत निम्मस्तर लिपिक स्टाफ, A – ग्राफिक्स, पाचोरा, ऑपरेटर स्टाफ व सेक्यूरिटी स्टाफ तसेच पाथरवट परिवार, भास्कर नगर व गाडगेबाबा नगर मित्र मंडळातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.