भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे कोविड लसी चे शुभारंभ आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

0
452

भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे कोविड लसी चे शुभारंभ आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पाचोरा ( प्रतिनिधी ) येथील गेल्या मागील वर्षभरापासून जगभरात कोरोना वायरसने थैमान घातले असून या राष्ट्रीय महामारी संकटाला संपूर्ण देशभरातील नागरिक युद्ध पातळीवर सामना करीत आहे. 2021 वर्षामध्ये कोरोना पासून मुक्त होण्यासाठी लसीचे शोध लावून रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आली. या हेतूने महाराष्ट्र शासनाकडून देखील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही लस उपलब्ध करण्यात आली असून नागरिकांना लस पुरविले जात आहे, या लसीचे उद्घाटन दि.01/02/2021 वार सोमवार रोजी पाचोरा भडगाव मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ. किशोर पाटील यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले यावेळी पहिली लस ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज जाधव व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत पाटील यांना देण्यात आली, लसीचा कुठल्याही नागरिकांना गैरसमज होऊ नये म्हणून आधी ही पहिली चाचणी जनतेच्या विश्वासासाठी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यावेळी आ. किशोर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजकाल सोशल मीडियाच्या कार्यकाळात लसीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे व चुकीच्या अफवा पसरविले जात आहे. तरी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाच्या व आपल्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी लस घ्यावी असे आवाहन आ. किशोर पाटील यांनी केले आहे या वेळी गणेश आण्णा परदेशी मा. नगराध्यक्ष, सुनिल देशमुख मा. नगराध्यक्ष,
डॉक्टर समाधान वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटिल, डॉ. साहेबराव अहिरे, डॉ. नितिन गेडाम, डॉ. श्रीकांत मराठे, धनंजय पाटील, प्रवीण ब्राम्हणे, सुधाकर पाटील, अधिपरीचारीका शोभा नरसिंग भुरे, मनिशा परदेशी, विशाखा झोडगे, प्रीती गाडेकर, प्रमोद सतुके, किरन राठोड, इ. तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टॉप व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जे कोरोना पॉझीटीव होते अशांनी या आजारावर मात करत पुन्हा सेवेत हजर झालेत अशा डॉक्टर्स, ANM सिस्टर्स, MPW तसेच अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स इ.चा सत्कार मा.आप्पासाहेबांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करणात आले.