अर्थसंकल्प मांडला की गुजरात पॅटर्न राबविला हेच समजत नाही दुर्दैव भारतीयांचे :सचिन सोमवंशी

0
680

अर्थसंकल्प मांडला की गुजरात पॅटर्न राबविला हेच समजत नाही
दुर्दैव भारतीयांचे :सचिन सोमवंशी

पाचोरा (प्रतिनिधी) :- देशाचा अर्थसंकल्प म्हटला की संपूर्ण भारतीयांचे लक्ष वेधले जायचे मात्र आज चा अर्थसंकल्प हा केवळ भविष्यातील गुजरात पॅटर्न कसा राहील याचे प्रदर्शन करण्यात आले हा दुर्दैवी प्रकार असल्याचे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी म्हटले आहे.

भारतातील १३० कोटी हुन अधिक जनतेचे भविष्य ठरवणारा अर्थसंकल्प असतो मात्र आज इतिहास तज्ञ असलेल्या व्यक्तीने अर्थसंकल्प मांडला त्यामुळे भारतीयांची पुर्णपणे निराशा झाली आहे. या अर्थसंकल्पात जुन्या गोष्टी खोट्या पध्दतीने मांडल्या गेल्या उद्याहरण म्हणजे ७५ वर्षे वयाच्या कर्मचारी पेशन्स धारकाला करात आधी पासून सुट असतांना परत तोच मुद्दा घेतला. दुर्दैवी प्रकार म्हणजे गुजरात राज्यातील खाजगीकरण पॅटर्न हा देशात लावण्यासाठी भविष्यात कोणत्या कंपनीच्या विक्री होणार हे आजच जाहीर केले. तर ज्या एलआयसी ने भारताला कर्ज देत होती त्याला आता खाजगी करण्याचा पध्दतशिर डाव पीओपो काढुन करण्यात येत आहे. यातून नफ्यातील कंपनी आपली विश्वासार्हता गमवुन बसेल. जनसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प नसुन मुठभर कार्पोरेटर ठरवतील तसे भविष्यात घडणार आहे. शेतकरी, नागरीक, सामान्य व्यापारी, सरकारी नोकर यांचे हीत या अर्थसंकल्पात कुठेच नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मुर्ख समजले की काय असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे सचिन सोमवंशी यांनी शेवटी स्पष्ट केले आहे. संपूर्ण देशात देशाला अपंगत्व आणुन हुकुमशाही कडे वाटचाल सुरू झाली आहे