पाचोरा पोलीसात तिन चोरट्यावर गुन्हा दाखल . दोन पकडण्यात यश.एक साथिदार फरार

0
925

पाचोरा पोलीसात तिन चोरट्यावर गुन्हा दाखल . दोन पकडण्यात यश.एक साथिदार फरार

एन एस भुरे ( पाचोरा )

शहरातील बळीराम पाटील नगरात घरासमोर ठेवलेली ५ हजार रूपये किंमतीची बॅटरीची चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलीसांनी अटक केली तर एक साथिदार फरार झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामकृष्ण कौतीक पाटील (वय-५२) रा. बळीराम पाटील नगर हे खासगी नोकरी करतात. त्यांच्या घराच्या पोर्चमध्ये ठेवलेली ५ हजार रूपये किंमतीची बॅटरीची चोरी करतांना एकाला पकडले. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. शेख कलीम शेख गुलाब (वय – ३५) रा. जारगांव व जुम्मा शहा मौलाशा फकीर (वय – ३७) रा. खडकदेवळा ता. पाचोरा यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली देत त्यांचे कडील पांढऱ्या रंगाची १५ हजार रुपये किंमतीची एस्कॉर्ट ट्युबलर बॅटरी व एम. एच. १९ एन. के. २६१३ क्रमांकाची मोटरसायकल ताब्यात घेण्यास पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल (डी.बी) राहुल सोनवणे, मल्हार देशमुख, विनोद बेलदार, संदिप सोनवणे यांना यश आले आहे.

  • पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेचे प्रमुख राहुल सोनवणे, मल्हार देशमुख, विनोद बेलदार, संदिप सोनवणे यांना दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे.