मेन लाइनचा तुटलेला जंप दुरुस्थ करीत आसताना विजेच्या खांबावरच दुर्देवी मृत्यू 

0
682

एन एस भुरे ( पाचोरा )


 पहुर,ता . जामनेर  – मेन लाइनचा तुटलेला जंप दुरुस्थ करीत आसताना विजेच्या खांबावरच दुर्देवी मृत्यू 

घटना आज सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पहूर – जामनेर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ रोहिणी हॉटेलच्या समोर घडली  याबाबत अधिक माहिती अशी की ,सोनाळा शिवारात ११ हजार किलो वॅट क्षमतेच्या वीज वाहिनीच्या पोलवरील तुटलेला जंप दुरुस्त करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या पहूर -२ कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र प्रकाश पवार (वय – ३८ ) हे विद्युत खांबावर चढले . जंप दुरुस्त करण्याचे काम सुरू असताना वीज पोल वरच त्यांचा मृत्यू झाला . पोलवर लटकलेल्या स्थितीत शेजारील शेतकऱ्यांनी त्यांचा मृतदेह  पाहिला असता त्यांना धक्काच बसला .सदर घटनेची  शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली . माहीती मिळताच उपकार्यकारी अभियंता व्ही . डी .सोनवणे , सहाय्यक अभियंता गजानन सोनवणे ,पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहूल खताळ  आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला .मयत राजेंद्र पवार यांचा मृतदेह पोल वरून खाली उतरवितांना गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते .या घटनेची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे . जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले . राजेंद्र पवार हे जामनेर येथे लक्ष्मी कॉलनीत राहात होते . पहूर – २ विज वितरण कंपनीच्या कार्यालयात ते वरीष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते . त्यांच्या कडे सोनाळा भागाची जबाबदारी होती .गेल्या दहा वर्षांपासून ते वीज वितरण कंपनीत चांगली सेवा देत होते .स्वभावाने विनोदी आणि मनमिळावू असलेल्या राजेंद्र पवार यांच्या अकस्मात मृत्यूने सोनाळा -पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .त्यांच्या पश्चात दोन मुले ,पत्नी ,भाऊ असा परिवार आहे .