मुलाचे प्रेम आल घरच्यांच्या अंगाशी आई आणि भाऊ गंभीर जखमी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
1030

मुलाचे प्रेम आल घरच्यांच्या अंगाशी
आई आणि भाऊ गंभीर जखमी
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एन एस भुरे ( पाचोरा )

पाचोरा शहरातील  शिवकॉलनी भागातील एका मुलाने मुलीस पळवुन नेल्याचा राग आल्याने मुलीच्या वडीलांसह सहा जणांनी मुलीस पळवुन नेणाऱ्या भावास व आईला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याचेवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले नव्हते.
सारोळा रोडवरील शिव काॅलनी भागात लिलाबाई संतोष जाधव (वय -४०) ही विधवा महिला आकाश व प्रविण या मुलांसोबत राहते. दि. ७ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत मुलगा आकाश हा घरी न आल्याने लिलाबाई हिने दुसरा मुलगा प्रविण यास आकाश कुठे आहे ? असे विचारल्यानंतर मी बाहेर गावी मित्राच्या लग्न गोंधळासाठी आलो आहे असे सांगितले. मात्र त्याच दिवशी रात्री १:३० वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ आप्पा विठ्ठल जगताप, भैय्या जगताप, पवन पुंडलिक जगताप, बंडु पडोळ, संदिप पडोळ व हरि पुंडलिक जगताप राहणार सर्व पाचोरा यांनी घरासमोर येवुन शिवीगाळ करत घर उघडण्यास भाग पाडले व तुमचा मुलगा कुठे गेला आहे ? असे विचारुन घरासमोरील उभी असलेली मोटरसायकल ची तोडफोड केली. व ज्ञानेश्वर उर्फ आप्पा जगताप याने लिलाबाई जाधव यांना शिवीगाळ करत तुझा मुलगा आकाश याने माझ्या मुलीस पळवून नेले असे संभोधुन आकाशचा घरी असलेला भाऊ प्रविण संतोष जाधव याचे डोक्यावर हातातील लोखंडी वस्तुने बेशुद्ध होई पर्यंत मारहाण केली. यात प्रविण हा गंभीर जखमी झाल्याने त्यास शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डोक्यावर गंभीर जखमा झालेल्या असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास खाजगी रुग्णालयात उपचार करण्याचा सल्ला दिला. घटने प्रकरणी ज्ञानेश्वर जगताप यांचे सह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौबे व सहाय्यक फौजदार रामदास चौधरी हे करीत आहेत.