ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे आज दिनांक 11/2/2019 रोजी जागतिक यूनानी दिवस साजरा करण्यात आला 11 फेब्रुवारी हा दिवस हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जागतिक युनानी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, हकीम अजमल खान यांचे युनानी पद्धतीमध्ये मोलाचा वाटा आहे युनानी पद्धतीमध्ये संधिवात, दमा, मुळव्याध, मुतखडा, कातडीचे आजार व इतर आजारांमध्ये चांगल्या पद्धतीचे उपचार आहे, अशी युनानी पद्धतीची माहिती डॉक्टर इमरान शेख यांनी दिली, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अमित साळुंखे होते या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर नाईक, डॉक्टर पंकज नानकर, डॉक्टर अनुपमा भावसार व कर्मचारी वृंद हजर होते, तसेच डॉक्टर इमरान शेख यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.