अद्ययावत रुग्णवाहिका पाचोरा – भडगाव तालुका वासीयांसाठी हजर – मा. आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण,

0
308

एन एस भुरे (पाचोरा)

अद्ययावत रुग्णवाहिका पाचोरा – भडगाव तालुका वासीयांसाठी हजर – मा. आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण,

पाचोरा : नगर विकास मंत्री मा.ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 100 रुग्णवाहिकेंचा लोकार्पण सोहळा दोन दिवसांअगोदर मुंबई येथे संपन्न झाला त्यानिमित्त त्यांनी त्यातील एक रुग्णवाहिका माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या क्षेत्रातील नागरिकांच्या सेवेसाठी आमदार साहेबांच्या ताब्यात दिली, ही रुग्णवाहिका संपूर्ण अद्यावत सेवेने परिपूर्ण आहे, आज रोजी माननीय किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा-भडगाव तालुक्यातील नागरिकांच्या सेवेसाठी हजर करत लोकार्पण केले, या वेळी सदर रुग्णवाहिकेवर निळकंठ पाटील हे सेवा देणार असल्याचे व सेवाघेणाऱ्यांकडून कोणतेही शुल्क न आकारता फक्त डिझेल भरून पाचोरा,भडगाव, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, अशा सर्वच शहरात पेशंट ला या रुग्णवाहिकेत घेऊन जाता येईल असे सांगत गरजू लोकांनी या दर्जेदार उत्तम अशा रूग्ण सेविकेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले,

यावेळेला  मुकुंद अण्णा, उदय मराठे, सुमित पाटील, रावसाहेब पाटील, दिनकर देवरे, संजय गोहिल, पदमसिंग पाटील, गणेश पाटील, किशोर बारावकर, शरद पाटील, रवि गीते, रामू पाटील, पंढरीनाथ पाटील, वाघ गुरुजी, पप्पू राजपूत, बंडू चौधरी, प्रवीण ब्राह्मणे, छोटू पाटील, तात्या साहेबराव पाटील, भरत खंडेलवाल, शरद पाटे, गंगाराम पाटील, दादाभाऊ, छोटू आप्पा, दत्ता जडे, प्रल्हाद भाऊसाहेब, पप्पू प्रजापत, बापू हटकर, संजय पाटील भुराआप्पा, विलास पाटील, अनिल पाटील, सुनील देशमुख, निलेश पाटील, जेके पाटील, विश्वास पाटील, माधवराव पाटील, सौ सुनीता बाई पाटील, मंदाबाई पाटील, सुनंदा महाजन, किरण ताई पाटील, उर्मिला ताई, सुषमाताई, स्मिता बारावकर, जया पवार, बेबाबाई पाटील, वाडेकर आशा दांडगे, जया पवार, ज्योती सोनवणे,शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते,