ता.उदगीर जि.लातुर हेर येथे शेतीच्या वादातून डोक्यात कु-हाडीने घाव घालून सख्या भावाचा व भावाच्या जावयाचा खुन

0
297

प्रतिनिधी उदगीर

ता.उदगीर जि.लातुर
हेर येथे शेतीच्या वादातून डोक्यात कु-हाडीने घाव घालून सख्या भावाचा व भावाच्या जावयाचा खुन करण्यात आला असून एकजण गंभीर जखमी झाले आहे. हि घटना हेर शिवारात सकाळी साडेसातचे सुमारास घडली आहे. हेर येथील गोविंद महादू जगताप, भगवान महादू जगताप व आरोपी बालाजी महादू जगताप या तिघा भावांचे हेरच्या उत्तर शिवारात महांडोळ रस्त्यालगत शेती असून गोविंद जगताप, भगवान जगताप व गोविंद जगतापचा जावाई नितिन यांचे एकत्र कुटुंब असून गोविंदचा लहान भाऊ बालाजी जगताप हा यांच्या पासून विभक्त आहे. या दोन जगताप कुटूंबात बरेच वर्षापासूनचा शेतीचा वाद होता. गुरुवारी सकाळी साडेसात वाजताचे सुमारास याच कारणामुळे गोविंद जगताप, भगवान जगताप व गोविंदचा घरजावाई नितिन फावडे यांना गोविंदचा सख्या लहान भाऊ बालाजी जगताप व बालाजीचे दोन मुले अंकुश जगताप व लहू जगताप यांनी अगोदर गोविंद जगताप यास काठी, कु-हाडीने मारहाण केली व जखमी गोविंदला मोटारसायकलवर दवाखान्यात घेऊन जात असताना गोविंदचा मधवा भाऊ भगवान जगताप व गोविंदचा जावाई नितिन फावडे यांना वाटेत गाठून काठी-कु-हाडीने घाव घालण्यात आले. यात गोविंद महादू जगताप (70),भगवान महादू जगताप ( 60) व जावाई नितीन भास्कर फावडे ( 30) रा. उंबरदरा ता शिरुर अनंतपाळ या तिघांना जबर मार लागला व ते जमिनीवर निपचित पडल्याने मयताच्या मुलीने गावात येवून घटनेची माहिती दिल्याने गावातील लोकांनी तिन्ही गंभीर जखमींना रक्तबंबाळ अवस्थेत प्रथम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले व तेथून रुग्णवाहिकेने उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी तपासणी करुन गोविंद जगताप मयत झाल्याचे सांगितले व नितीन फावडे यास लातुरला घेऊन जाण्यास सांगितले. लातूरला जात असताना नितीन फावडे याचाही मृत्यु झाला. तर जखमी भगवान जगतापवर उदगीर येथे उपचार चालु आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी जनाबाई बाळासाहेब बिरादार यांच्या फिर्यादीवरुन आरोपी बालाजी महादू जगताप ( 55 ) अंकुश बालाजी जगताप ( 27) व लहू बालाजी जगताप ( 25 ) फुलाबाई बालाजी जगताप, सोजरबाई विश्वंभर ढगे, पुजा बालाजी, अश्विनी जगताप, पंडीत बापुराव पाटील यांच्या विरुद्ध गुरन 63/2021 कलम 302,307,341,323,504,143,147,148,149भादवी सहकलम 25(4) शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यातआला आहे. व तिन्हीही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे हे करीत आहेत. दरम्यान गोविंद जगताप यांचा हेर येथे शेतात तर जावई नितीन फावडे याचा त्याच्या गावी उंबरदरा येथे सायंकाळी सात ते साडेसाता वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हेर येथे आरोपी व मयताच्या घर परिसरात मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला आहे.यामुळे परिसराला छावनिचे स्वरुप आले आहे