एन एस भुरे ( पाचोरा )
मोहाडी जवळ महिंद्रा पिकप चालकाने अचानक ब्रेक लावल्याने रुग्णवाहिकेला अपघात
पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर येथील 108 अंबुलन्स चालक स्वप्निल देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 4:35 वाजेच्या दरम्यान हि घटना घडली अंबुलन्स क्रमांक एम एच 14 सी एल 0850 मध्ये कुऱ्हाड तांडा येथून दोन जखमीना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना वारंवार हॉर्न व सायरन वाजून सुद्धा महेंद्र पिकप गाडी क्रमांक एम एच 19 एल 3380 वरील चालकाने दोन किलोमीटर पर्यंत साईड दिली नाही. अचानक मोहाडी फाट्याजवळ ब्रेक मारल्याने अंबुलन्स ची धडक बसली यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही परंतु अंबुलन्स च्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. महिंद्र पिकप चालक यांनी स्वतःचे लायसन अंबुलन्स चालकास दिले तुमची अंबुलन्स पुढे चालू द्या मी तुमच्या मागे येतो असे सांगितले त्याच्या सांगण्यानुसार अंबुलन्स चालक हा गाडीत असलेल्या जखमी रुग्णांना घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे पोहोचला परंतु महिंद्र पिकप चालक हा अंबुलन्स च्या मागे न येता गाडी घेऊन फरार झाला. अंबुलन्स जवळ महिंद्र पिकप चालकाने लायसन दिले आहे लायसन वर चालकाचे नाव नाना शहरु रायसिंग राहणार सटाणा असे आहे. या घटनेबाबत अमोल चालक यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे