एन एस भुरे ( पाचोरा )
बिल्दी धरण पुलाजवळ दोन मोटारसायकलींचा समोरा समोर धडक एक ठार तर चार जखमी
दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ च्या सुमारास बिल्दी धरणा वरील पुलाजवळ दोन मोटारसायकलींचा समोरा समोर अपघात झाल्याने बिल्दी येथील रहिवासी विशाल मनमोहन पाटील या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित चार अपघातग्रस्तांना पाचोरा व जळगाव येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की गोराडखेडा येथील रहिवासी परंतु हल्ली मुक्काम बिल्दी येथे राहात असलेले विशाल पाटील हे काही कामानिमित्त पाचोरा येथे जात असताना रस्त्यात त्यांचा अपघात झाला यामध्ये गाडी क्रमांक एम एच १९ एन २३०३ फोर एस चॅम्पियन कंपनीची तर दुसरी गाडी क्रमांक एम एच १९ डी आर २५९२ स्प्लेंडर कंपनीची गाडी असून या दोन्ही गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे. यामध्ये अपघात झालेल्या जखमींची कुठल्या प्रकारची माहिती अद्याप मिळालेली नसून अपघातात मृत्यू झालेले विशाल पाटील यांना त्यांचे काका शशिकिरण देवराम पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकारी अमित साळुंखे यांनी मयत घोषित केले होते, यामध्ये पाचोरा पोलीस स्थानकात अमित साळुंके यांच्या माहितीवरून पोलीस शिपाई दिपक सुरवाडे यांच्याकडे अपघात मृत्यु रजिस्ट्रेशन नंबर १६/ २०२१ सीआरपीसी १७४ प्रमाणे मृतावस्थेत दाखल केले बाबत एम एल सि नंबर १२८६ अन्वये कळविल्याने अपघाती मृत्यू दाखल केला असून सदर घटनेचा तपास पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या आदेशाने सहायक फौजदार विनोद शिंदे करीत आहेत.