एन एस भुरे ( पाचोरा )
दि १७/२/२०२१
पाचोरा:- पाचोरा व भडगाव दोघे तालुक्यांमध्ये सर्वाधिक सरपंच हे भारतीय जनता पार्टीचेच निवडून आले
नगरदेवळा ही ग्रामपंचायत पाचोरा -भडगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत असून शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा परिषद गट ओळखला जात होता. परंतु गेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे १७ पैकी १० हा स्पष्ट बहुमताचा आकडा पार करून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे.आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सौ. प्रतिक्षा किरण काटकर यांची सरपंच पदी तर श्री.विलास राजाराम भामरे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली असून यावेळी भाजपा नगरदेवळा शहर तर्फे घोषणा देऊन जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच व उपसरपंचा सह नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला,तसेच गावात विकास कामे करून नगरदेवळा गाव हे आदर्श गाव कसे करता येईल, या पद्धतीने लोकाभिमुख कामे करावी असे मार्गदर्शन अमोल शिंदे यांनी केले तसेच पाचोरा व भडगाव दोघे तालुक्यांमध्ये सर्वाधिक सरपंच हे भारतीय जनता पार्टीचेच निवडून आले असून पाचोरा व भडगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा नंबर १ चा पक्ष ठरला आहे. असे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले,
याप्रसंगी प.स.सदस्य मंगलताई पवार,सिद्धार्थ पवार,आबा काटकर,नामदेवभाऊ पाटील, राजेंद्र महाजन,सुनील राऊळ, विनोद परदेशी,राजू पवार,संजय कुंभार,दिलीप चौधरी,सुनील महाजन,पंकज पाटील,महेश पाटील,सागर पाटील,बुधा भोई,गोविंद महाजन,तसेच पत्रकार बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.