एन एस भुरे ( पाचोरा )
दि १९/२/२०२१
पाचोरा, शिवसेना कार्यालयात आ.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शिवरायांना हार अर्पण करण्यात आले.
पाचोरातील शिवसेना कार्यालयात शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण व पुजन करून अभिवादन केले. मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते
पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील शिवसेना कार्यालयात आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्षा प्रियंका वाल्मिक पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, नगरसेवक रहिमान तडवी, अॅड. दिनकर देवरे, सुधाकर महाजन, पप्पु राजपुत, नसीर बागवान, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील,नाना वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे पुजन व माल्यार्पण करुन अभिवादन केले.
शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार हे समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावे शिवाजी महाराजांसारखा दूरदृष्टीचा विचार करणारा असावा आणि ज्याला आपण म्हणू शकतो की सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणारा असा राजा एकमेव छत्रपती शिवाजी महाराज.आ.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शिवरायांना हार अर्पण करण्यात आले. अतिशय सुंदर आणि पारंपरिक वाद्यांत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवसेना कार्यालयात शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आले.