एन एस भुरे ( पाचोरा )
पाचोरा बस स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत जागतिक प्रवासी दिन समारंभ संपन्न
पाचोरा : आज दि. 19 फेब्रुवारी 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाचोरा बस स्थानक आगारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक प्रवासी दिन महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ, ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या तर्फे साजरा करण्यात आला,
यावेळी आपल्या आयुष्यात प्रवासी वर्गाची काळजी घेत उत्तम कार्य व सेवा बजाविणाऱ्या एस.टी चालकांचा सत्कार करतेवेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र पाचोरा अध्यक्ष श्री. शांताराम चौधरी यांनी आपल्या मनोगतात पाचोरा आगारातील ज्या चालकांनी आपल्या कार्यकाळात विना अपघात, कोणत्याही प्रकारची दुर्घटना झालेली नाही, अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच चालकांचा आम्ही आज शाल श्रीफळ गुलाब पुष्प सन्मान देऊन सत्कार करित आहोत अशाच प्रकारे त्यांच्या भावी सेवा काळात विना अपघात उत्कृष्ट सेवा घडो अशीच सेवा आगारातील प्रत्येक चालकाच्या हातून घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो असे म्हंटले, यावेळी पाचोरा महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ, ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्यातर्फे ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका अध्यक्ष शांताराम चौधरी, जिल्हा संघटक राज्य प्रवासी संघ राजेंद्र शिंपी, पाचोरा तालुका प्रवासी महासंघ अध्यक्ष तथा ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापक अध्यख दिलीप पाटील, सचिव निलेश पाटील, आगार प्रमुख सौ. नीलिमा बागुल यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन सन्मानार्थींचा गौरव करण्यात आला,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगारप्रमुख सौ.नीलिमा बागुल होत्या सत्कारार्थी चालक श्री. सुरेश पंडित पाटील, श्री. अरुण लालसिंग पाटील, श्री. जाकीर पिंजारी, श्री. आर बी शेख, श्री. ए. बी. महाजन, कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे पाचोरा तालुका अध्यक्ष श्री दिलीप पाटील, यांनी केले सुत्रसंचलन व आभार जिल्हा संघटक प्रवासी महासंघ श्री. राजेंद्र शिंपी यांनी केले, आगारातील अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक, तसेच सर्व उपस्थितांनी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या या लक्षवेधी कार्यक्रमाचे आभार मानले,