शिवरायांच्या सन्मानार्थ असे हजारो गुन्हे स्वतःवर घेण्यास तयार- अमोल शिंदे

0
348

एन एस भुरे (पाचोरा)

शिवरायांच्या सन्मानार्थ असे हजारो गुन्हे स्वतःवर घेण्यास तयार- अमोल शिंदे

पाचोरा-
काल दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त अमोल शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास गेले असता अमोल शिंदे यांचेसह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी काल दिनांक 19 रोजी शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध भागातील तरुणांसह शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यास गेले असता शहराच्या विविध भागातील शेकडो तरुण शिवप्रेमींनी त्या ठिकाणी येऊन शिवजन्मोत्सवात सहभाग घेण्याचा प्रयत्न केला याप्रसंगी तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह 19 शिवप्रेमींवर कलम २६९,२७०,१८८,३७(१)(c),१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतीत अमोल शिंदे यांच्याशी विचारणा केली असता,छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास मी पुष्पहार अर्पण करण्यास गेलो असता पोलीस प्रशासनाने राजकीय दबावापोटी माझ्यासह अनेक शिवप्रेमींनवर गुन्हे दाखल केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असुन त्यांची जयंती साजरी करणे हा गुन्हा कसा काय ठरू शकतो आणि तो जर गुन्हा असेल तर असे हजारो गुन्हे मी स्वतःवर घेण्यास तयार असुन अश्या पद्धतीने दडपशाही पद्धतीने कारवाई करणाऱ्या शिवद्रोही ठाकरे सरकारचा मी निषेध करतो आणि शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त मते मागण्यासाठी वापर करत असते तसेच आपले आमदार साहेब हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असुन मुख्यमंत्री त्यांच्या पक्ष्याचे आहेत.त्यांनी सर्व पाचोरा-भडगाव तालुक्यातील तरुणांच्या व शिवप्रेमींच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात मा.मुख्यमंत्री महोदयांना निर्णय घेण्यासाठी विनंती करायला हवी होती.मात्र त्यांना महाराजांच्या बाबतीत जर थोडीही आस्था राहिली असती तर त्यांनी निदान कालचा दिवस तरी राजकारण बाजुला ठेऊन पोलीस प्रशासनावर दबाव आणून गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले नसते असा थेट आमदारांवर आरोप करत शिवजन्मोत्सव साजरा करून मी कुठलाही गुन्हा केलेला नाही त्यामुळे सरकारला काय कारवाई करायची ती करू द्या तसेच माझ्या सह ज्या तरुणांवर व शिवप्रेमींवर गुन्हे दाखल केले गेले आहेत.त्यांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये असे याप्रसंगी त्यांनी सांगितले