एन एस भुरे ( पाचोरा )
दि २२/२/२०२१
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जिल्हाधिकारी यांच्या कोविड बाबतच्या मार्गदर्शक सूचनांच्या पालनाची पाचोऱ्यात ठिकठिकाणी दंडात्मक कडक कारवाई सुरू
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोविड बाबतच्या संकेतानंतर जळगांव जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, या सूचनांचे पालन करत पाचोरा नगरपालिका प्रशासन व पोलिस निरीक्षक किशनराव नजनपाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा येथे शिवाजी चौक येथे नंदकुमार जगताप,पो,कॉ,बापु महाजन,पो,कॉ, विजयसिंग पाटील, नगर पालिकाचे कर्मचारी, अनिल वाघ, प्रकाश लहासा, सचिन जगताप, यांच्यातर्फे संयुक्तिकरित्या कारवाई करण्यात येत असून काल पाचोरा मधील मंगल कार्यालय, लॉन्स वरती दंडात्मक कारवाई करत हाजारो रुपय आकारण्यात आला. आज पाचोरा येथील
रहदारीची ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नगरपालिका कर्मचारी व पोलिस कर्मचारी बांधव यांकडून मास्क लावा, शिस्त पाळा याबाबत जागृती करून यांचे पालन न करता असेच बाहेर पडणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करून शिस्त पाळाविच लागेल अन्यथा कारवाईला सामोरे जावेच लागेल अशा स्वरूपाची कारवाई सुरू आहे.