पत्रकार संघाचे द्विवार्षिक सोळावे राज्य अधिवेशन ठाणे येथे 27 फेब्रुवारी रोजी होणार – विश्वासराव आरोटे
एन एस भुरे ( पाचोरा )
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे द्विवार्षिक 16
वे राज्यस्तरीय अधिवेशन दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी ठाणे येथे गडकरी रंगायतन सभागृहात सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत दोन सत्रामध्ये होत आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या द्विवार्षिक 16 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख आणि माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, माहिती महासंचालक दिलीप पांढरपट्टे, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे नुतन अध्यक्ष मंदार पारकर, पत्रकार संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष राजु परुळेकर, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोशियन प्रांतिक अध्यक्ष गोविंद घोळवे, जेष्ठ पत्रकार राजा माने यांना निमंत्रित करण्यात आले असुन यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. तर कोरोनानंतर माध्यमांचे बदलते स्वरुप या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, साम टीव्हीचे संपादक राजेंद्र हुंजे, न्यु इंडियन एक्सप्रेसचे सहाय्यक संपादक सुधीर सूर्यवंशी, लोकमतचे मुख्य उपसंपादक योगेश बिडवाई, न्युज नेशनचे असोसिएट एडिटर सुभाष शिर्के सहभागी होणार आहेत. तर पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची यावेळी प्रगट मुलाखत पत्रकार भागवत तावरे आणि भगवान राऊत घेणार आहेत. यावेळी पत्रकार संघाच्या विविध पुरस्कारांचे वितरण आणि विविध ठराव घेतले जाणार आहेत. कोरोनाचे नियम पाळून मर्यादित संख्येत अधिवेशन होणार असल्याने या अधिवेशनाला सर्व विभागीय अध्यक्ष, पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष राकेश टोळ्ये, किरण जोशी, वृत्तवाहिनी प्रमुख रणधीर कांबळे, मनिष केत, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव आणि संयोजक कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.
Home ताज्या घडामोडी पत्रकार संघाचे द्विवार्षिक सोळावे राज्य अधिवेशन ठाणे येथे 27 फेब्रुवारी रोजी होणार...