☄️आरोग्य दुत न्युज – ब्रेकींग 💥 धमाका -पाणी-पुरी फस्त – शासकीय कर्मचारी मस्त कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण असलेला शासकीय कर्मचारी याने आज भर चौकात पाणी-पुरीचा घेतला आस्वाद

0
1034

☄️आरोग्य दुत न्युज  – ब्रेकींग न्युज पाचोरा 💥 धमाका –

कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण असलेला शासकीय कर्मचारी याने आज भर चौकात पाणी-पुरीचा घेतला आस्वाद

” पाणी-पुरी फस्त – शासकीय कर्मचारी मस्त

पाचोरा प्रतिनिधी : आज ज्या रूग्णांचा कोरोना पाॅझिटिव्ह रिपोर्ट आला आहे.

त्या रूग्णांनी तपासणी अहवाल आल्यानंतर होम क्वोरंटाईन होऊन आपला उपचार करणे बंधनकारक आहे किंवा परीस्थिती गंभीर असल्यास जवळच्या कोवीड रूग्णालयात किंवा शासकीय कोवीड सेंटर मध्ये उपचार घेणे प्राथमिक कर्तव्य हे रूग्णांचे आहे.

परंतु – शासकीय नियमांचा व यंत्रणेचा धुव्वा सर्वसामान्य नागरीक नव्हे तर शासकीय यंत्रणेमधील जबाबदार शासकीय कर्मचारी हे दिवसाढवळ्या कोरोना नियमांची पायमल्ली करतांना आरोग्यदुत न्युज चॅनलचे संपादक एन एस भुरे यांना प्रत्यक्ष आढळुन आलेले आहे.

कोरोना पाॅझिटिव्ह आल्यानंतर नियमानुसार शासकीय कर्मचारी यांनी होम क्वोरंटाईन राहणे हे बंधनकारक असतांना सदर शासकीय कर्मचारी हा निरामय हाॅस्पिटलजवळ पाणी-पुरीचा आस्वाद घेत असतांना आढळला.

सदर रूग्णासोबत त्यांची पत्नी सोबत होती.

संबंधित शासकीय कर्मचारी हा कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर जर भर चौकात येऊन पाणी-पुरी खात असेल तर ? अशा चुकांमुळे कोरोना आजार पाचोरा शहरात पसरवण्याचा प्रकार हा आरोग्य प्रशासनासह सर्व नागरीकांची चिंता वाढविणारा आहे.

तरी या घटनेची जबाबदारी कोणी स्विकारावी ? व अशा घटनांना नेमके कोण जबाबदार राहणार ? हि चर्चा आता शहरात रंगु लागलेली आहे.

कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांसाठी सध्या काय उपचार पध्दती आहे व सर्वसामान्य नागरीकांची सुरक्षा हि मोकळे फिरणारे पाॅझिटिव्ह रूग्णांपासुन कशी होईल ? तसेच ज्या रूग्णांना घरी होम क्वोरंटाईन केलेले आहे.ते मोकळे फिरू नये यासाठी त्यांच्यावर नेमके कोण लक्ष ठेवणार ? व त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाने कोणती यंत्रणा उभी केली आहे ? या घटनेला अजुन कोणा-कोणाला जबाबदार धरावे ? याचा खुलासा तातडीने संबंधित पाचोरा आरोग्य विभागासह माननीय तहसिलदार चावडेसाहेब व माननीय उपविभागीय अधिकारी कचरेसाहेब यांनी करावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे आणि हि अशी शासकीय कर्मचारीकडुनचं होणारी दिरंगाई करणारे संबंधित पाणी-पुरी शासकीय कर्मचारी’वरती काही कडक कारवाई व निर्बंध शासकीय नियमानुसार संबंधित प्रशासन करणार का ? याकडे आरोग्यदुत न्युज चॅनेल चे लक्ष लागुन राहणार आहे.