श्रीमती.वैशाली चव्हाण सौंदाणे आस्था अनघादि फौंउडेशन च्या अध्यक्ष यांना जनभुषण व कर्मभुषण पुरस्काराने सन्मानित केले गेले 

0
262

आरोग्य दूत न्यूज, एन एस भुरे ( पाचोरा )

श्रीमती.वैशाली चव्हाण सौंदाणे आस्था अनघादि फौंउडेशन च्या अध्यक्ष यांना जनभुषण व कर्मभुषण पुरस्काराने सन्मानित केले गेले 

नाशिक २३ फेब्रु. पंचवटी इंदिरा नगर येथील क्रांतीसुर्य रायडर्सच्या वतीने राष्ट्रसंत कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच सदरच्या कार्यक्रमात विवीध जाती धर्माच्या गुणी जनांना ” जनभुषण व कर्मभुषण ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी शिंदखेडा येथिल तहसीलदार मा.सुनिल जी सौन्दांणे यांच्या त्या सुविद्य पत्नी आहै. समाज सेविका सौ.वैशाली सौंदाणे चव्हान यांना मान्यवरांच्या हस्ते जनभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे माननीय श्री.शंकर नाना कोंडाजी मोकळ हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.नगरसेविका सिमाताई ताजणे यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच माननीय ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रस्तावनेत संस्थेचे उद्देश व समाजातील महापुरुषांचे योगदान तसेच गाडगे बाबांचे कार्य याविषयी माहिती उपस्थीतांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नीलम अभंग (मंडलिक) व प्राध्यापक सौ.गितांजली चौधरी यांनी केले.सदरच्या कार्यक्रमासाठी प्रसंगी आभार महिला आघाडीप्रमुख सौ.सुरेखा माळी (काळे ) यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन श्री.सुनील त्रिभुवन,संघटक नंदकिशोर बोरसे,अध्यक्ष पालक शिक्षक संघ महासचिव अविनाश माळी कार्याध्यक्ष प्रशांत पुंड ,शरद मंडलिक आदींनी योगदान दिले.पुरस्कार्थी सौ.वैशाली सौंदाणे चव्हान,सौ.मंगला पिसे आणि सौ.उमा दिंडे/सोनावणे आदी पुरस्कार्थींनी पुरस्कार दिल्या बाबत संस्थेचे आभार व्यक्त केले.