एन एस भुरे पाचोरा
दि २५/२/२०२१ तालुका पाचोरा सहाय्यक दुय्यम निबंधक ज्ञानदेव चव्हाण एसीबीच्या जाळ्यात,
सातशे रुपयांची लाच भवली जळगाव सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय तालुका पाचोरा येथील वरिष्ठ लिपिक (प्रभारी सहाय्यक) लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील शेत मिळकती व घर मिळकतीच्या एकूण आठ उतारांच्या मूल्यांकन दाखला घेण्यासाठी तक्रारदार ॲड अनिल पाटील, यांनी अर्ज दाखल केला होता त्याकामी शासकीय फीच्या व्यतिरिक्त लाचेच्या रूपात मोबदला म्हणून वरिष्ठ लिपिक ज्ञानदेव साहेबराव चव्हाण याने सातशे रुपयांची मागणी तक्रार दाराकडे केली तक्रारदाराच्या तक्रारीनुसार एसीपी पथकाने ज्ञानदेव चव्हाण याने सातशे रुपयांची लाच घेताच त्याच्यावर एसीबी पथकाने झडप घातली व सापळा रचून एसीबी पथकाने पंचा समक्ष ज्ञानदेव चव्हाण याला ताब्यात घेतले