पाचोरा, कॉग्रेसचा अभिनव उपक्रम जिजाऊंच्या हस्ते शिवपुजन

0
237

आरोग्यदूत न्यूज, एन एस भुरे ,( पाचोरा )

पाचोर्यात कॉग्रेसचा अभिनव उपक्रम जिजाऊंच्या हस्ते पुजन

दि २५/२/२०२१ नेहमी कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम झाला तर नेत्याच्या हातुन होत असतो पण याला अपवाद ठरला तो पाचोरा कॉग्रेस ने शिवपुजन साठी जिजाऊंच्या हस्ते पुजन केलेला कार्यक्रम.

महाराष्ट्रात कोरोना महामारी पुन्हा डोके वर काढले आहे त्यामुळे कमीत कमी लोक चा नियम पाळत पाचोरा कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी येथील शिवजन्मोत्सव निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण कु. दिव्या रविंद्र नेवे हिच्या हस्ते करण्यात आले तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महीला लिगल सेल जिल्हाध्यक्ष अॅड. मनिषा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, अॅड. अण्णासाहेब भोईटे, मनियार, रवींद्र नेवे, राहुल शिंदे, कल्पेश येवले,गणेश पाटील आदी उपस्थित होते