आरोग्यदूत न्यूज
दि १/३/२०२१
पाचोरा, आपला शेतकरी हवालदिल;
बाजारात लसूणाची विक्री अवघी 50 ते 40 रुपये किलो!!
पाचोरा, (जि. जळगावं) कोरोना वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन होणार असल्याच्या केवळ चर्चेमुळे व संचारबंदीच्या भीतीने शेतकऱ्यांवर येथील रस्त्यांवर फिरून ओरडून ग्राहकांना कवडीमोल दरात तोट्यात अवघ्या 50 ते 60 रुपये किलो दराने लसूण घाईने विकण्याची वेळ आली आहे. बाजारात सध्या भाव 125 ते 150 रुपये किलो आहे. स्वस्त दरात लसूण खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड झाली.
स्वस्त दराने ग्राहकांना लसूण मिळत असल्यामुळे दिलासा मिळत असला, तरी शेतकरी, विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर पडत्या भावाने माल विकण्याची पाळी आल्याने खिन्नता व चिंता पाहावयास मिळत आहे. पाचोरा व आजूबाजू भागातील चिंतातूर शेतकरी गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाला तोंड देतायेत. आपल्या भागात नवा लसूण काढण्यास सुरुवात झाली आहे. लसणाला चांगला दर मिळण्याची आशा होती, तेवढ्यात कोरोनाने पुन्हा तोंड वर काढले आणि शेतकरी हवालदिल होऊन व लॉकडाउन, संचारबंदीच्या भीतीने जवळ असलेला माल गावोगाव फिरून रस्त्यावर तोट्यात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.