औरंगाबाद, सोयगाव गोंदेगाव येथे ग्रामसभा संपन्न,

0
836

आरोग्य दूत न्यूज,
तात्या नगरे ( प्रतिनिधी )
औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव, गोंदेगाव येथे ग्रामपंचायत 26/ 2 /2021 रोजी ग्रामसभा घेण्यात आली व त्यात पहिला ठराव एकादशी चतुर्थी या दिवशी कोणत्याही प्रकारचे मास मटण मासे विक्री होणार नाही, असे ठराव ग्रामपंचायत ग्रामसभेत करण्यात आलेला आहे. त्याकरिता आज मंगळवार दिनांक 2 /3 /2021 या दिवशी चतुर्थी असून गोंदेगाव येथील बाजार भरला असून तिथे बाजार मास, मच्छी,आंडी यांचे दुकान बाजारात एकही नाही व ग्रामसभेच्या ठरावानुसार सर्व मटण, मास दुकानदारांनी सुद्धा दुकान बंद ठेवलेले आहे. व ग्रामसभा चे  ठरावाचे आमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व गावकरी व महिलांनी सरपंच ग्रामसेवक व   ग्रामपंचायत सदस् यांचे गोंदेगाव कर यांनी आभार मानलेल आहे.