पाचोरा, मिठाबाई कन्या शाळेत महिला शिक्षकांचा सन्मान

0
312

आरोग्यदूत न्यूज

एन एस भुरे पाचोरा

मिठाबाई कन्या शाळेत महिला शिक्षकांचा सन्मान

पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मीठाबाई) कन्या विद्यालयात तारीख 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षिका भगिनींचा सन्मान करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रा रवींद्र चव्हाण अध्यक्षस्थानी होते.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा रवींद्र चव्हाण यांनी आपल्या मनोगतात विद्यालयातील सर्व शिक्षीकांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव केला. तसेच महिला शिक्षिका म्हणून स्री शिक्षणाचे अलौकिक कार्य करण्याची संधी कन्या विद्यालयातच मिळाली हे तुमच्या स्री जन्माचे मोठे भाग्य आहे, अशा शब्दात कन्या विद्यालयातील सर्व शिक्षीकांच्या कार्याचा सन्मान केला.

श्री साहेबराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती बागड, माया सूर्यवंशी, कुंदा पाटील -शिंदे, कल्पना पाटील, श्रीमती सपकाळे, प्रणाली टोणपे, श्रीमती दांडेकर मॅडम, सुरेखा बडे, प्रा. प्रतिभा परदेशी, मनीषा कुंभार आदी शिक्षिका भगिनी उपस्थित होत्या.

जयदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिवाजी शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा किसन भारुळे, सुवर्णसिंग राजपूत , आर.ओ. पाटील, हिरालाल परदेशी, आबाजी पाटील, शिवराम पाटील आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पर्यवेक्षक कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पालक सदस्य उपस्थित होते