पाचोरा, गो से हायस्कूलमध्ये महिला शिक्षकांचा सन्मान

0
290

आरोग्यदूत न्यूज

एन एस भुरे (पाचोरा)

गो से हायस्कूलमध्ये महिला शिक्षकांचा सन्मान
पाचोरा- येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण

संस्था संचलित श्री गो से हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षिका भगिनींचा सन्मान करण्यात आला मुख्याध्यापक सुधीर पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सन्मान सोहळ्यात सर्व महिला शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांचा सन्मान करताना मुख्याध्यापक सुधीर पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात महिलांच्या हाती केवळ कुटुंबाचीच समाजाची आणि एकूणच सशक्त राष्ट्र घडवण्याची जबाबदारी असून भारतीय संस्कृतीने महिलांना शक्तीस्वरूप मानले असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी पर्यवेक्षक ए बी अहिरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले तर महिला शिक्षकांनी देखील या सोहळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी.एम वाघ पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन.आर. ठाकरे, ए बी. अहिरे,टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालय प्रमुख अजय सिनकर यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित होते