फडणवीसयांनी जळगावकरांची बदनामी थांबवावी :- सचिन सोमवंशी

0
764
  1. आरोग्यदुत न्यूज

संपादक:-एन एस भुरे (पाचोरा) फडणवीसयांनी जळगावकरांची बदनामी थांबवावी :- सचिन सोमवंशी

पाचोरा, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ाच्या कोणत्याही घटना इतक्या रंजक पद्धतीने मांडल्या जात नाही मात्र अपुर्ण माहिती च्या आधारावर जळगाव ची बदनामी केली जाते ती विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या सह त्यांच्या नेत्यांनी जळगावकरांची माफी मागावी अशी मागणी श्री सोमवंशी यांनी केली आहे

भारतीय जनता पार्टी चे नेते विधानसभा असो की बाहेर जळगाव च्या कुठल्याही घटनेवर
रंजक पद्धतीने मिडिया समोर मांडल्या जातात याचेच दुःख होत आहे. नुकतीच शासकीय महीला वसतीगृहातील घटनेत घटनेच्या अपुर्ण माहिती च्या आधारावर विधानसभेच्या सभागृहात विरोधीपक्ष नेता भाजपा चे देवेंद्र फडणवीस, आ. सुधीर मुनगंटीवार, आ. श्वेता महाले यांनी ज्या पद्धतीने महीला अत्याचाराची जळगाव ची घटना मांडली त्यावरून स्पष्ट झाले की भाजपा चे नेते

जळगाव ची बदनामी करायला मागेपुढे पाहत नाहीत. श्री. फडणवीस यांनी तर बलात्कार पर्यंत भावनेच्या भरात बोलुन टाकले तर मुनगंटीवार यांनी राष्टपती राजवट ची मागणी केली. माझी विनंती आहे या नेत्यांना आपण आपल्या राजकारणासाठी जळगाव ची बदनामी थांबवा जळगावकरांचा अंत बघु नका मागिल जखमा अजून भरल्या नाहीत असे शेवटी सचिन सोमवंशी यांनी सांगितले आहे.