सोयगाव, गोंदेगाव :- येथे किराणा दूकान आणि जनरल स्टोअर्स व मोटरसायकल गॅरेज जळुन खाक,

0
942

आरोग्य दूत न्यूज
तात्या नगरे ( प्रतिनिधी )
सोयगाव, गोंदेगाव :- येथे किराणा दूकान अँड जनरल स्टोअर्स व मोटरसायकल गॅरेज जळुन खाक,
तालुका सोयगााव, जिल्हा औरंगाबाद येथील किराणा अँड जनरल स्टोअर्स व मोटरसायकल गॅरेज शॉर्टसर्किटमुळे झाला असेल असा संशय आहे. दिनांक 9/3/2021मंगळवार रोजी श्री दिपक लोटन पाखले यांचे किराणा दुकान व जनरल स्टोअर्स श्री मंगलसिंग त्रंबक राजपुत यांच्या मोटरसायकल गॅरेजला रात्री दोन ते सव्वादोनच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागलेली दिसून आली व ती आग इतकी प्रचंड होती की ती आग आटोक्यात आणणं अवघड होतं म्हणून.अग्निशामक दलाचे पथक पाचोरा येथुन बोलवण्यात आले. अग्निशामन गाडी रात्री पावणे तीनच्या सुमारास येऊन आग आटोक्यात आणली त्यानंतर किराणा दुकानात, डी फ्रीज,साधे,फ्रिज किराणा वस्तू असे अनेक वस्तू जळून खाक झालेली आहेत त्याच्या बाजूला असलेले  मोटर सायकल गॅरेज मधिल मोटरसायकली दोन ते तीन जळाले आहेेत. त्यानंतर स्पेअर पार्ट व  मोटरसायकलचे टायर ट्यूब व दुरुस्तीचे संपूर्ण सामान दोघही दुकानाचे सामान जळून खाक झाले, एवढेच नव्हे तर मोटरसायकल यांचे मॅकविल यांचेही पाणी झाले पोलिस पंचनामा नुसार लाखोंच नुकसान झालेलं आहे इलेक्ट्रिसिटीच्या शॉर्टसर्किटमुळे झालेे, असावे असा अंदाज पोलीस पंचनामा करतांना सांगण्यात आले, व त्यांना उदरनिर्वाहासाठी एवढेच एक साधन होते, शासनाकडून योग्य ती मदत मिळावी असे श्री दिपक लोटन पाखले यांचे नुकसान 120,000 रु झालेला आहे. श्री  मंगलसिंग त्र्यंबक राजपूत यांचे नुकसान 130,000 रु झालेलं आहे.तरी नुकसान भरपाई मिळावी असे श्री दिपक लोटन पाखले व श्री  मंगलसिंग त्र्यंबक राजपूत यांनी अपेक्षा वेक्त  केली त्यातल्या त्यात ग्रामपंचायत सदस्य व सरपंच आजी-माजी सरपंच व गावकरी हे सर्वच उपस्थित होते.
गोंदेगाव येथे काही लोक कोरोनाचा विषय गांभिर्याने घेत नसल्याचे दिसून येते. अजूनही बऱ्यापैकी विनामस्क फिरणारांची संख्या कमी नाही.
तरी माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक साहेबांनी अश्या सूचना दिल्यास खुपच महत्त्वाचे होईल.