जळगाव,  जिल्हयात कोरोनाची कहर

0
270

आरोग्य दूत न्यूज
संपादक, एन एस भुरे (पाचोरा ) 

११/३/२०२१

जळगाव, जिल्ह्यात स्वॕब घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा 954 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आज जिल्ह्यात जळगाव शहर 310 , जळगाव ग्रामीण 42 , भुसावळ 70 ,अमळनेर 18, चोपडा 121 ,पाचोरा 17 , भडगाव 21 ,धरणगाव 57,यावल 30 ,एरंडोल 98,जामनेर 31, रावेर 9,पारोळा 7,चाळीसगाव 72,मुक्ताईनगर 32, बोदवड 15 आणि इतर जिल्ह्यातील 4 असे एकूण 954 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.

आज दिवसभरात रूग्ण 425 बरे झाले असून आतापर्यंत एकूण 60005 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 6248 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 67680 झालेली आहे. जिल्ह्यात आज 6 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1427 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.