आ.किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर

0
381

आरोग्य दूत न्यूज
संपादक, एन एस भुरे (पाचोरा)
११/३/२०२१
आ. किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर
पाचोरा, तालुक्यातील नगरदेवळा, खाजोळा, सार्वे बु” पुला उभारणीसाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्ना नंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नगरदेवळा, खाजोळा, सार्वे बु” तालुका हद्द सा. क्र. २२/८६० टी. आर. ०९ येथील पुलाचे निर्माणासाठीचा प्रस्ताव आमदार किशोर पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सादर केला होता. यावेळी आमदार.किशोर आप्पा पाटील यांनी पुलाच्या निर्माणाची गरज मंत्री हसन मुश्रीफ यांच्या लक्षात आणून देत सखोल चर्चा केली. याची मंत्री  मुश्रीफ यांनी तातडीने दखल घेऊन २ कोटी रुपये निधीस मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला. प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. सदर विकासकामांना भरीव निधी उपलब्ध करून देणेकामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आदेशानव्ये तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सहकार्यांने निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.