आरोग्य दूत न्यूज
संपादन, एन एस भुरे (पाचोरा)
पाचोरा, शहरातील उन्नती महिला मंडळ व अखिल भारतीय महिला समाज प्रबोधन संस्था यांच्यातर्फे लाडशाखिय वाणी समाजातील विविध महिलांचा सत्कार,
पाचोरा शहरातील उन्नती महिला मंडळ व अखिल भारतीय महिला समाज प्रबोधन संस्था यांच्यातर्फे आज आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त लाडशाखिय वाणी समाजातील विविध महिलांचा सत्कार करण्यात आला. आज आठ मार्च रोजी पाचोरा शहरातील लाडशाखिय वाणी समाजातील काही महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला असून त्यात कोंडवाडा गल्ली, येथील मिठा बाई प्राथमिक शाळा येथील आदर्श शिक्षिका सौ भारती बागड (पिंगळे) मॅडम यांना नुकताच राज्य शासनातर्फे सावित्रीबाई फुले जिल्हा आदर्श शिक्षक विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला तसेच वैशाली भिकन येवले यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी अनेक संकटांना तोंड देत आपला स्वतःचा उदरनिर्वाह करून वेळप्रसंगी त्यांनी घरगुती उद्योग चालू केले व आपल्या मुलांचा सांभाळ केला व कुठलाही आधार नसताना घर सांभाळले तसेच सौ विद्या संजय कोतकर कै. पि. के. शिंदे प्राथमिक विद्यालय येथे शिक्षिका असून विज्ञान या विषयाची आवड असून त्यामध्ये त्यांनी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम करून विद्यालया मार्फत त्यांनी राज्यस्तरीय भाग घेऊन त्यामध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले. तसेच नुकत्याच लोहटार येथे सरपंच झालेल्या सौ मनीषा महाल पुरे व उत्कृष्ट गायिका म्हणून महाराष्ट्र राज्य मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या संगीता लाड या लाडशाखीय समाजातील पुरस्कार मिळालेले व सौ भारती बागड (पिंगळे) मॅडम सौ विद्या कोतकर मॅडम, सौ वृषाली येवले या महिलांचा आज आठ मार्च रोजी सत्कार करण्यात आला हा सत्कार उन्नती महिला मंडळ अध्यक्ष सौ संगीता येवले व महिला मंडळ सदस्य सौ प्रणिता येवले सौ मनीषा येवले, सौ नीता शेंडे, सौ मीना शेंडे, सौ अनघा येवले, सौ वैशाली तरटकर, सविता चिंचोले व अंजली सिनकर या लाडशाखीय वाणी समाजातील महिलांनी सत्कार करण्यात आला.