पाचोरा, गो. से.हायस्कूलला जयंती व सत्कार सोहळा संपन्न

0
228

आरोग्य दूत न्यूज
संपादक,एन एस भुरे (पाचोरा)

गो. से.हायस्कूलला जयंती व सत्कार सोहळा संपन्न

पाचोरा- येथील श्री.गो. से. हायस्कूलमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक सुधीर पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेऊन सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांतर्फे अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेतील शिक्षिका श्रद्धा पवार मॅडम यांना मातृसेवा फाउंडेशन ठाणे,स्माईल यवतमाळ आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्तुत्वान महिला पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे माजी पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांचे हस्ते त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ,चेअरमन  संजय वाघ, मा.सचिव ऍड महेश देशमुख,व्हॉ. चेअरमन व्ही. टी. जोशी,शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी  अभिनंदन केले असून यावेळी शाळेचे  मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी.एम वाघ पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन.आर. ठाकरे, ए बी. अहिरे,टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालय प्रमुख अजय सिनकर यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.