पाचोर व भडगाव तालुक्यासाठी २८ कोटी रुपयांची निधी मंजूर, किशोर आप्पा पाटील,

0
786

आरोग्य दूत न्यूज
संपादक, एन एस भुरे (पाचोरा)
दि, १३/३/२०२१
पाचोर व भडगाव तालुक्यातील २८ कोटी रुपयांच्या निधी मंजूर, किशोर आप्पा पाटील,
पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध रस्ते विकासाच्या   व लहान पुलाच्या बांधकामांसाठी आपण पुन्हा एकदा भरघोस निधी खेचून आणला असून पाचोर व भडगाव तालुक्यातील सुमारे २८ कोटी रुपयांच्या कामांसह ८० किलोमीटरचा रस्त्यांसह १ लहान पुलाच्या कामास मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे यामुळे दळण वळणाची सोय अधिक जलद होणार असून यामुळे मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया आ.किशोर अप्पा पाटील यांनी दिली असून आपल्या निवासस्थानी ‘ शिवालय’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे एवढा निधी खेचून आणण्यात आपल्याला यश आले असून याकामी आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , श्री एकनाथरावजी शिंदे,  श्री अजीत दादा पवार उपमुख्यमंत्री तथा  अर्थमंत्री,  सार्वजनिक बांधकाम मंत्री ना अशोकराव चव्हाण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सहकार्य मिळाले असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, मुकुंद अण्णा बिलदीकर,जिल्हा प्रमुख ऍड अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील,शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील,प्रवीण ब्राह्मणे,डॉ हेमराज पाटील यांची उपस्थिती होती.
मंजुरी मिळालेल्या कामात प्रामुख्याने पिंप्रीहाट रामा सावदा गुढे वडाळी १२.५ किलोमीटरचा २.७५ कोटी रुपयांचा रस्ता,आर्वे शिरूड तरवाडे पळासखेडे मध्ये लहान पुलांच्या बांधकामासाठी ५० लक्ष रुपये,भडगाव वाक पळासखेडा दरम्यान ३ कोटी रुपायांचा १२ किलोमीटर चा रस्ता ,वाडे गोंडगाव कनाशी भडगाव दरम्यान सुमारे ३ कोटी ४० लक्ष रुपयांचा ५ किलोमीटरचा रस्ता, नांद्रा माहेजी (कुरंगी फाटा ते माहेजी गावातील देवी मंदिरापर्यन्तचा रस्ता २ कोटी रुपयांचा रस्ता, नगरदेवळा नेरी भामरे दरम्यान १०किलोमीटरचा १ कोटी ६० लक्ष रुपयांचा रस्ता, लोहारी ते आंबेबडगाव दरम्यान ५किलोमीटरचा २कोटी ५० लाखांचा रस्ता, चुंचाळे ते विष्णुनगर दरम्यान ६ किलोमीटरचा सुमारे ३ कोटी रुपायांचा रस्ता, नगरदेवळा ते नीपाणे दरम्यान ६ किलोमीटरचा १कोटी ५० लक्ष रुपयांचा रस्ता, गाळण ते चिंचखेडा दरम्यान ५ किलोमीटरचा सुमारे २कोटी २५ लाख रुपयांचा रस्ता ,वरसाडे ते डोकलखेडा दरम्यान ५ किलोमीटरचा १ कोटी ८०लक्ष रुपायांचा रस्ता, तर लासगाव ते बांबरुड दरम्यान ५ किलोमीटरचा २ कोटी ५०लक्ष रुपयांच्या कामांचा समावेश असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.