आरोग्य दूत न्यूज,
संपादक, एन एस भुरे (पाचोरा)
पिंपळगाव हरेश्वर येथे कोरोना लसीकरण सुरू करावे– शालिग्राम मालकर,
पिंपळगाव हरेश्वर हे पाचोरा तालुक्यातील महत्वाचे व साधारणतः पंचवीस हजार लोकसंख्येच् गाव असून याठिकाणी ग्रामीण रुग्णालय, अंबुलन्स, डॉ, सिस्टर, ब्रदर यांचा पुरेसा स्टाफ सुद्धा आहे, गावात साधारणतः ३००० पेक्षा अधिक वृद्ध वय वर्ष ६० पेक्षा अधिकचे आहेत तर ४५ वयापेक्षा अधिक व्याधीग्रस्त सुद्धा १००० पेक्षा जास्त आहेत
या सर्वांना लसीकरणाची तात्काळ गरज असून गावात लसीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्याने काही लोक जवळच्या वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात, तिथे जाण्यायेण्यात वृद्धांचा, व्याधीग्रस्त नागरिकांचा वेळ वाया जातोय, कधीकधी वरखेडी फेरी वाया जाते, त्यात वेळ आणि पैश्याचा अपव्यय होतो.
तरी पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात त्वरित कोरोना लसीकरण सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मा तालुकाध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांचेशी सुद्धा संपर्क साधला असून त्यांनी लसीकरण केंद्र सुरू करणेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे
आपलाच,
शालिग्राम ओंकार मालकर
मो नं ९४२२५६८८७२