पाचोरा, तालुका सह शिक्षण संस्था संचलित सौ सु गि पाटील माध्यमिक विद्यालय व सौ ज ग पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय “तंबाकू मुक्त शाळा”बनली आहे.

0
338

आरोग्य दूत न्यूज,
संपादक, एन एस भुरे (पाचोरा)

तंबाकू मुक्त शाळा
सौ सु गि पाटील माध्यमिक  विद्यालय व सौ ज ग पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, भडगांव

      पाचोरा तालुका सह शिक्षण संस्था संचलित सौ सु गि पाटील माध्यमिक विद्यालय व सौ ज ग पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय “तंबाकू मुक्त शाळा”बनली आहे.
शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, सलाम फाऊंडेशन मुंबई, तंबाकू नियंत्रण कक्ष जळगांव, जनमानवता बहुउद्देशीय संस्था व सानेगुरुजी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “तंबाकू मुक्त शाळा” अभियान भडगांव तालुक्यात राबविण्यात आले.
येलो लाईन कार्यक्रम अंतर्गत शासनाने ठरवून दिलेले नऊ निकष शाळेने पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे शाळा “तंबाखू मुक्त शाळा” म्हणून घोषित करण्यात आली आहे. अशा प्रकारे तालुक्यात तिसऱ्या क्रमांकाची तंबाकू मुक्त शाळा ठरली असून जळगाव जिल्हा स्तरावर भडगांव तालुका तंबाखूमुक्त शाळेचा तालुका म्हणून घोषित होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
याकामी तालुका गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी साहेब, केंद्र प्रमुख भाऊसो रवींद्र सोनवणे, जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य राज मोहम्मद शिकलकर साहेब, जिल्हा सल्लागार डॉ नितीन भारती, जयेश माळी, तंबाखू मुक्त शाळा समन्वयक सतिष सिहले यांचे मार्गदर्शन लाभले.
यलो लाईन कार्यक्रमातर्गत आवश्यक नऊ निकषांच्या पूर्ततेसाठी शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य विश्वासराव साळुंखे, उपमुख्याध्यापक किशोर पाटील, पर्यवेक्षक अरुण पाटील व एस एम पाटील, गणेश व्यंकटराव पाटील यांचे मागदर्शन लाभले.
शाळेचे जेष्ठ शिक्षक तसेच तंबाकू मुक्त शाळा प्रशिक्षणाचे जिल्हा व तालुका तज्ञ मार्गदर्शक प्रकाश जनार्दन विसपुते यांनी शाळा “तंबाखू मुक्त शाळा” होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
शाळा “तंबाकू मुक्त शाळा” झाल्याबद्दल पिटीसी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ, चेअरमन नानासो संजय वाघ, व्हाईस चेअरमन नानासो व्ही टी जोशी, मानद सचिव दादासो महेश देशमुख, शालेय समितीचे चेअरमन आबासो दत्तात्रय पवार, कनिष्ठ महाविद्यालय समितीचे चेअरमन बाबासो विनय जकातदार व व्यवसाय अभ्यासक्रम समितीचे चेअरमन नानासो देशपांडे शाळा प्रशासनाचे अभिनंदन करून उपक्रमाचे कौतुक केले