पाचोरा,उपविभागीय अधिकारी (प्रांत)व तहसिलदार यांच्या निवासाचा प्रश्न अखेर मार्गी लागला, आमदार, किशोर आप्पा पाटील

0
315

आरोग्य दूत न्यूज,
संपादक, एन एस भुरे (पाचोरा)
उपविभागीय अधिकारी (प्रांत)व तहसिलदार यांच्या निवासाचा प्रश्न अखेर मार्गी लागला,
आमदार, किशोर आप्पा पाटील
पाचोरा प्रशासकीय वर्तुळासाठी आनंदाची बातमी आली असून अनेक वर्षे प्रलंबित असलेला उपविभागीय अधिकारी (प्रांत) व तहसिलदार यांच्या निवासाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून त्यांच्या निवास्थानांच्या बांधकामासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून यासाठी आमदार किशोर पाटील यांनी शासन दरबारी २०१८ पासून सतत पाठपुरावा केला होता.
प्रशासकीय अंगाने पाचोरा व भडगाव उपविभागाचा मोठा विस्तार झालेला असून यासाठी स्वतंत्र उपविभागीय दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते तसेच पाचोरा तालुका देखील मोठा आहे व या अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे क्रमप्राप्त असते  मात्र या अधिकाऱ्यांना अद्याप पर्यंत शासकीय निवासाची सोय नसल्याने काही प्रमाणात अडचणी येत असल्याने आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या समस्येची दखल घेत निवासस्थानांच्या मंजुरी साठी प्रयत्न केले होते.
दरम्यान उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे साठी होणारी ही निवासस्थाने भडगाव रोड वरील गट नंबर ८७ ब /१ वरील शासकीय विश्रामगृह (डाग बंगला) आवारात होणार असून या कामांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे.यामुळे महसूल प्रशासन वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी आमदार किशोर अप्पा पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.निवास्थानांचा पाठपुरावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात ,नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिक्रिया-
प्रशासकीयदृष्ट्या या प्रमुख अधिकाऱ्यांसाठी निवासाची सोय होणे गरजेचे होते यामुळे अधिकाऱ्यांना स्थिरता मिळून प्रशासन अधिक गतिमान पद्धतीने कार्य करते म्हणून  प्रमुख विषयाचा पाठवपुरावा केला व त्याला यश आले आहे.
किशोर अप्पा पाटील
आमदार – पाचोरा भडगाव विधानसभा